रत्नागिरी जिल्हा कोतवाल भरती 2026| महसूल सेवक पदांची जाहिरात प्रसिद्ध ८ जागांसाठी ऑफलाइन अर्ज सुरू

तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, रत्नागिरी अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील तोणदे, नाचणे (म्यु.आत), मावळंगे, मिरजोळे, फणसवळे, बसणी, केळ्ये आणि मेर्वी या ८ सजांमधील महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या सरळसेवा भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.  


Ratnagiri Kotwal Bharti 2026
Ratnagiri Kotwal Bharti 2026



​या भरतीअंतर्गत पात्र उमेदवारांकडून तहसीलदार रत्नागिरी यांच्या कार्यालयात समक्ष (Offline) अर्ज मागविण्यात येत आहेत. या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  08 जागा 

Ratnagiri Kotwal Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -


जात प्रवर्ग / सामाजिक आरक्षण सर्वसाधारण महिला आरक्षण भरावयाची एकूण पदे
अनुसूचित जमाती (ST) १ १ २
विमुक्त जाती - अ (VJ-A) १ १ २
सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग (SEBC) १ ० १
भटक्या जमाती - ड (NT-D) १ ० १
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) १ ० १
अराखीव (खुला / Open) १ ० १
एकूण पदे ६ २ ८
 

Ratnagiri Kotwal Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 


​१. उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व त्यास मराठी भाषेचे ज्ञान असावे

​२. उमेदवार हा रत्नागिरी तालुक्यातील मूळ रहिवासी असणे अनिवार्य आहे. (अर्जासोबत तहसीलदार यांचा रहिवाशी दाखला जोडणे आवश्यक आहे)


​३. उमेदवाराचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे. अंतिम निवड झालेल्या उमेदवारास १ महिन्याच्या आत मा. जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागेल

​४. उमेदवारावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसावा किंवा शिक्षेची नोंद नसावी. अंतिम निवडीनंतर १ महिन्याच्या आत सक्षम अधिकाऱ्याचे 'चारित्र्य व वर्तणूक प्रमाणपत्र' सादर करणे बंधनकारक आहे.

​५. अर्जदार कोणत्याही राजकीय पक्षाचा अथवा संघटनेचा सभासद नसावा, तसेच राजकीय दबाव आणल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.अर्जदार कोतवाल पदाच्या कर्तव्यात बाधक ठरेल अशा कोणत्याही व्यवसायात गुंतलेला नसावा.

​६. अर्जासोबत विहित नमुन्यातील लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जोडणे बंधनकारक आहे. (उमेदवार अविवाहित असल्यास प्रतिज्ञापत्रावर 'अविवाहित' असा स्पष्ट उल्लेख करावा)

​७. आरक्षित प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे सक्षम प्राधिकाऱ्याचे मूळ जातीचे प्रमाणपत्र, चालू आर्थिक वर्षाचे वैध नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (SC/ST वगळून इतर मागास प्रवर्गांसाठी), किंवा चालू तारखेचे EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास) असणे अनिवार्य आहे. SEBC / मागासवर्गीय उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र ६ महिन्यांच्या आत सादर करण्याच्या अटीवर तात्पुरती नियुक्ती दिली जाईल.

​८. महसूल सेवक (कोतवाल) म्हणून निवड झाल्यानंतर मिळालेल्या नेमणुकीच्या सजेमध्येच (गावात) वास्तव्य करणे उमेदवारास बंधनकारक राहील. 

Ratnagiri Kotwal Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - ०२ ऑक्टोबर २०२६ रोजी 

उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे असणे आवश्यक आहे.

वयाची सूट - महसूल सेवक (कोतवाल) हे पद अवर्गीकृत (Unclassified) असल्यामुळे सामाजिक, आर्थिक व महिला आरक्षण वगळता अन्य कोणत्याही आरक्षणाच्या तरतुदी किंवा वयोमर्यादेत शिथिलता (सूट) लागू राहणार नाही. 

Ratnagiri Kotwal Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  

अर्ज नमुना फॉर्म शुल्क -  रु. ५०/- (तहसील कार्यालय रत्नागिरी येथून मूळ अर्जाचा छापील नमुना घेताना रोख स्वरूपात जमा करणे आवश्यक आहे).

​परीक्षा शुल्क :- रु. ५००/- (सर्व प्रवर्गांतील उमेदवारांसाठी).

परीक्षा शुल्क रु. ५००/- रोख स्वरूपात तहसीलदार रत्नागिरी यांच्या कार्यालयात बंद लिफाफ्यात अर्ज जमा करतेवेळी भरून त्याची रीतसर पावती प्राप्त करून घेणे अनिवार्य आहे.

नोकरी ठिकाण - रत्नागिरी

Ratnagiri Kotwal Recruitment Apply Online 2026 

जाहिरात व अर्ज नमुना - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - १७ ऑक्टोबर २०२६ (कार्यालयीन वेळेत, सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत) ही आहे.



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post