रायगड जिल्हा कोतवाल भरती 2026|महसूल सेवक पदांची जाहिरात प्रसिद्ध; अलिबाग व मुरुड तालुक्यासाठी अर्ज सुरू

उपविभागीय अधिकारी कार्यालय, अलिबाग (जिल्हा रायगड) अंतर्गत अलिबाग आणि मुरुड तालुक्यांतील विविध सजांमध्ये महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या सरळसेवा भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Raigad Kotwal Bharti 2026
Raigad Kotwal Bharti 2026


​या भरतीअंतर्गत पात्र उमेदवारांकडून संबंधित तहसील कार्यालयात समक्ष (Offline) अर्ज मागविण्यात येत आहेत.या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  30 जागा 

Raigad Kotwal Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -    

अलिबाग तालुका -


जात प्रवर्ग / सामाजिक आरक्षण सर्वसाधारण महिला आरक्षण भरावयाची एकूण पदे
अनुसूचित जाती (SC) २ १ ३
अनुसूचित जमाती (ST) १ ० १
विमुक्त जाती (A) १ ० १
भटक्या जमाती (C) १ १ २
भटक्या जमाती (D) १ ० १
इतर मागासवर्ग (OBC) २ १ ३
सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग (SEBC) १ १ २
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) १ १ २
अराखीव (खुला / Open) ३ १ ४
एकूण १३ ६ १९
 


मुरुड तालुका -

जात प्रवर्ग / सामाजिक आरक्षण सर्वसाधारण महिला आरक्षण भरावयाची एकूण पदे
अनुसूचित जाती (SC) १ १ २
भटक्या जमाती (B) १ ० १
सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग (SEBC) १ ० १
इतर मागासवर्ग (OBC) १ १ २
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) १ ० १
अराखीव (खुला / Open) ३ १ ४
एकूण ८ ३ ११
 

Raigad Kotwal Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - ​


१. उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व त्यास मराठी भाषेचे ज्ञान असावे.

​२. उमेदवार हा अलिबाग किंवा मुरुड यांपैकी ज्या तालुक्यासाठी अर्ज करत आहे, त्या संबंधित तालुक्याचा मूळ रहिवासी असणे अनिवार्य आहे. (अर्जासोबत ग्रामसेवक किंवा मुख्याधिकारी यांचा रहिवाशी दाखला जोडणे आवश्यक आहे).

​३.उमेदवाराचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारास १ महिन्याच्या आत जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागेल. (हे पद क्षेत्रीय स्वरूपाचे व एकाकी असल्याने अपंगांसाठीचे आरक्षण लागू नाही).

​४.उमेदवारावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसावा किंवा शिक्षेची नोंद नसावी. अंतिम निवडीनंतर १ महिन्याच्या आत चारित्र्य व वर्तणूक प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

​५.अर्जदार कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा संघटनेचा सभासद नसावा. कागदपत्र पडताळणीवेळी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक आहे.

​६.शासनाच्या नियमानुसार अर्जासोबत विहित नमुन्यातील लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जोडणे बंधनकारक आहे. (अविवाहित उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रावर 'अविवाहित' असा उल्लेख करावा).

​७.आरक्षित प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे सक्षम प्राधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, चालू आर्थिक वर्षाचे वैध नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (SC/ST वगळून इतर मागास प्रवर्गांसाठी), किंवा EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास) असणे अनिवार्य आहे.

८.महसूल सेवक (कोतवाल) म्हणून निवड झाल्यानंतर मिळालेल्या नेमणुकीच्या सजेमध्येच (गावात) वास्तव्य करणे उमेदवारास बंधनकारक राहील.

Raigad Kotwal Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - 02 ऑक्टोबर 2026 रोजी

किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे 

वयाची सूट - कोतवाल हे पद अवर्गीकृत असल्यामुळे वयोमर्यादेत कोणतीही शिथिलता किंवा सूट लागू राहणार नाही

Raigad Kotwal Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  

​अर्ज नमुना फॉर्म शुल्क :- रु. ५०/- (तहसील कार्यालयातून अर्जाचा नमुना घेताना रोख स्वरूपात जमा करणे आवश्यक आहे).

  • ​खुला प्रवर्ग (Open Category) परीक्षा शुल्क - रु. ५००/-
  • ​मागासवर्गीय प्रवर्ग (Reserved Category) परीक्षा शुल्क -  रु. ३००/-

​परीक्षा शुल्क रोख स्वरूपात संबंधित तहसीलदार (अलिबाग / मुरुड) यांच्या कार्यालयात अर्ज सादर करतेवेळी जमा करून त्याची पावती प्राप्त करून घेणे अनिवार्य आहे.

नोकरी ठिकाण - अलिबाग , मुरुड 

Raigad Kotwal Recruitment Apply Offline 2026 

जाहिरात - अलिबाग | मुरुड 


अर्ज करण्याची शेवटची तारीख - १७ ऑक्टोबर २०२६ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत)


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post