जिल्हाधिकारी कार्यालय पालघर अंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील १२२ रिक्त सजांमध्ये महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
![]() |
| Palghar Kotwal Bharti 2026 |
या भरतीअंतर्गत वाडा, पालघर, वसई, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या तालुक्यातील विविध सजांसाठी पात्र उमेदवारांकडून समक्ष (Offline) अर्ज मागविण्यात येत आहेत. या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 122 जागा
Palghar Kotwal Recruitment Vacancy Details 2026
पदांचा तपशील -
| अनुक्रमांक | तालुक्याचे नाव | एकूण जागा |
|---|---|---|
| १ | वसई | ३१ |
| २ | पालघर | २१ |
| ३ | वाडा | १७ |
| ४ | डहाणू | १६ |
| ५ | जव्हार | ११ |
| ६ | विक्रमगड | १० |
| ७ | तलासरी | ०९ |
| ८ | मोखाडा | ०७ |
| एकूण पदे | १२२ | |
Palghar Kotwal Recruitment Education Details 2026
शैक्षणिक पात्रता -
१. उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२. उमेदवाराला मराठी भाषा लिहिता व वाचता येणे अनिवार्य आहे.
३. उमेदवार संबंधित महसुली साझ्यामध्ये समाविष्ट गावातील मूळ स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे व तो तिथे राहण्यास तयार असावा. (अर्जासोबत गेल्या ३ महिन्यांतील ग्राम महसूल अधिकारी/तलाठी यांचा रहिवास दाखला जोडणे आवश्यक आहे).
४. अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) आरक्षित पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे प्रकल्प अधिकाऱ्यांनी निर्गमित केलेला 'पेसा स्थानिक अनुसूचित जमातीचा रहिवासी दाखला' असणे अनिवार्य आहे.
Palghar Kotwal Recruitment Age Limit Details 2026
वयाची अट - 02 ऑक्टोबर 2026 रोजी
किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे
वयाची सूट - कोतवाल हे पद अवर्गीकृत (Unclassified) असल्यामुळे वयोमर्यादेत कोणतीही सूट (मागासवर्गीय/आरक्षित प्रवर्गासाठी) लागू राहणार नाही.
Palghar Kotwal Recruitment Exam Fee Details 2026
अर्जाची फी -
खुला प्रवर्ग (Open Category): रु. ५००/-
राखीव प्रवर्ग (ST, SC, OBC, EWS इ.): रु. ३००/-
परीक्षा शुल्क "सदस्य सचिव, महसूल सेवक भरती २०२६ तथा तहसीलदार वाडा" यांच्या नावे कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेचा डी.डी. (Demand Draft) काढून अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.
नोकरी ठिकाण - पालघर
Palghar Kotwal Recruitment Apply Offline 2026
जाहिरात व अर्ज नमुना - Click Here
अर्ज पद्धत - ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १७ ऑक्टोबर २०२६ (सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत)
विहित नमुन्यातील अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तहसीलदार कार्यालयात समक्ष (Offline) नेऊन जमा करायचा आहे (सुट्टीचे दिवस वगळून).
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs
