उपविभागीय अधिकारी कार्यालय सावंतवाडी आणी कणकवली अंतर्गत सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग, देवगड, कणकवली आणी वैभववाडी तालुक्यांतील वेगवेगळ्या सजांमध्ये महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या सरळसेवा भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ह्या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांकडून संबंधित तहसील कार्यालयांत समक्ष (Offline) अर्ज मागवण्यात येत आहेत. या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 31 जागा
Sindhudurg Kotwal Recruitment Vacancy Details 2026
पदांचा तपशील -
| अनुक्रमांक | तालुक्याचे नाव | एकूण पदे |
|---|---|---|
| १ | सावंतवाडी | ०६ |
| २ | वेंगुर्ला | ०७ |
| ३ | दोडामार्ग | ०३ |
| ४ | देवगड | ०४ |
| ५ | कणकवली | ०८ |
| ६ | वैभववाडी | ०३ |
| एकूण पदे | ३१ | |
Sindhudurg Kotwal Recruitment Education Details 2026
शैक्षणिक पात्रता -
१. उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२. उमेदवार अर्ज करत असलेल्या संबंधित तालुक्याचा मूळ स्थानिक रहिवाशी असणे अनिवार्य आहे (तहसीलदारांचा रहिवाशी दाखला आवश्यक)
३. उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आसा, निवडीनंतर ६ महिन्यांच्या आत जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल
४. अर्जदारावर फौजदारी गुन्हा नसावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जोडणे अनिवार्य आहे.
५. आरक्षित प्रवर्गासाठी जातीचे प्रमाणपत्र, वैध नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र आणी EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास) अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.
Sindhudurg Kotwal Recruitment Age Limit Details 2026
वयाची अट - 02 ऑक्टोबर 2026 रोजी
किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे
वयाची सूट - महसूल सेवक (कोतवाल) हे पद अवर्गीकृत (Unclassified) असल्यामुळे सामाजिक, आर्थिक व महिला आरक्षण वगळता अन्य कोणत्याही आरक्षणाच्या तरतुदी किंवा वयोमर्यादेत शिथिलता (सूट) लागू राहणार नाही.
Sindhudurg Kotwal Recruitment Exam Fee Details 2026
अर्जाची फी -
अर्ज नमुना फॉर्म शुल्क - रु. ५०/- (तहसील कार्यालयातून रोख भरून मूळ अर्ज प्राप्त करून घेणे)
कोर्ट फी स्टॅम्प - अर्जावर रु. ५/- चा कोर्ट फी स्टॅम्प चिकटवणे गरजेचे आहे
परीक्षा शुल्क (कणकवली उपविभाग) -
मागासवर्गीय: रु. २००/-
इतर/खुला प्रवर्ग: रु. ३००/-
नोकरी ठिकाण - सिंधुदुर्ग
Sindhudurg Kotwal Recruitment Apply Online 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 ऑक्टोबर 2026
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs
