सांगली जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्रसाठी 894 जागांची भरती |Sangli Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026

सांगली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (सामान्य शाखा) माध्यमातून 'आपले सरकार सेवा केंद्र' (ASSK) २०२६ अंतर्गत तब्बल ८९४ नवीन केंद्रे वितरीत करण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

Sangli Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026
Sangli Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026



या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  894 जागा 

Sangli Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

अनुक्रमांक क्षेत्राचा प्रकार घटक / क्षेत्र संख्या उपलब्ध केंद्र (जागा)
ग्रामपंचायत क्षेत्र ६७० गावे ८०२
सांगली मिरज कुपवाड मनपा २० प्रभाग ६८
नगरपरिषद / नगरपंचायत ०६ क्षेत्रे २४
- एकूण देय केंद्र संख्या ८९४

तालुका व पालिका क्षेत्रनिहाय सविस्तर तपशील
अनुक्रमांक तालुका / पालिका क्षेत्र प्रकार जागा संख्या
जत (Jat)ग्रामीण१२४
वाळवा (Walwa)ग्रामीण११८
मिरज (Miraj)ग्रामीण९३
शिराळा (Shirala)ग्रामीण९१
तासगाव (Tasgaon)ग्रामीण८७
खानापूर विटा (Khanapur)ग्रामीण६६
कडेगाव (Kadegaon)ग्रामीण६२
कवठेमहांकाळ (Kavathe M.)ग्रामीण६२
आटपाडी (Atpadi)ग्रामीण५०
१०पलूस (Palus)ग्रामीण४९
११सांगली मिरज कुपवाड मनपामहानगरपालिका६८
१२ईश्वरपूर नगरपरिषदनगरपरिषद०८
१३विटा नगरपरिषदनगरपरिषद०६
१४आष्टा नगरपरिषदनगरपरिषद०४
१५जत नगरपरिषदनगरपरिषद०३
१६पलूस नगरपरिषदनगरपरिषद०२
१७तासगाव नगरपरिषदनगरपरिषद०१

एकूण सर्व पदे/केंद्रे ८९४
    

Sangli Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

  1. अर्जदार हा संबंधित ग्रामपंचायत, नगरपरिषद किंवा महानगरपालिका क्षेत्राचा मूळ स्थानिक रहिवास असणारा असावा (त्यासाठी रहिवासी दाखला किंवा डोमासाईल प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे).
  2. अर्जदार किमान १२ वी (HSC) उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. (जर तुमचे पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असेल, तर निवड प्रक्रियेत तुम्हाला अतिरिक्त गुण दिले जातील).
  3. MS-CIT, CCC किंवा शासनमान्य समकक्ष संगणक अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  4. ओळखपुरावा म्हणून आधार कार्ड व पॅन कार्ड, बँक पासबुक किंवा स्टेटमेंट आणि पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र (चारित्र्य पडताळणी) जोडणे बंधनकारक आहे.
  5. एका उमेदवाराला नागरी किंवा ग्रामीण भागापैकी केवळ एकाच क्षेत्रासाठी अर्ज करता येईल. एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केल्यास सर्व अर्ज बाद होतील.
  6. सध्या कार्यरत असलेले VLE, शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी (उदा. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य) या भरतीसाठी अर्ज करू शकत नाहीत.
  7. विवाहित महिलांनी केवळ विवाहानंतरच्या नवीन नावाने व पत्त्यानुसार अर्ज भरायचा आहे (त्यासाठी गॅझेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे).
  8. केंद्रासाठी स्वतःची किंवा भाड्याची किमान १०० चौ. फूट जागा, २ संगणक/लॅपटॉप, लेझर प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक डिव्हाईस आणि ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.

Sangli Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - 23 सप्टेंबर 2026 रोजी 

उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्षे पूर्ण असावे

महत्वाची अट -  वय १८ वर्षे पूर्ण असलेले आणि सांगली जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायत, नगरपरिषद किंवा महानगरपालिका क्षेत्राचे मूळ रहिवासी असलेले उमेदवार यासाठी पात्र असतील.  

Sangli Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Fee Details 2026 

अर्जाची फी -  500 ₹/- 

  • अर्ज शुल्क ₹५००/- (पाचशे रुपये) आहे
  • हे शुल्क पूर्णपणे नॉन-रिफंडेबल (Non-refundable) आहे, म्हणजेच ते कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क केवळ NEFT किंवा UPI द्वारे ऑनलाईन जमा करायचे आहे.
  • ऑनलाईन अर्ज भरताना पोर्टलवर (assksangli.in) दिलेला जिल्हाधिकारी कार्यालयाचा बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड वापरूनच पैसे ट्रान्सफर करायचे आहेत.
  • शुल्क भरल्यानंतर मिळणारा Transaction ID / UTR Number ऑनलाईन अर्जामध्ये अचूक नोंदवून चलनाची पावती/पावतीचा फोटो अपलोड करणे बंधनकारक आहे.

नोकरी ठिकाण - सांगली 

Sangli Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 सप्टेंबर 2026 रोजी 
( 11 : 59 वाजेपर्यंत ) 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post