जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्यातर्फे ठाणे जिल्ह्यातील नागरी/शहरी भागातील नागरिकांना शासकीय सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी एकूण ८३२ नवीन 'आपले सरकार सेवा केंद्र' (VLE) मंजूर करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 832 जागा
Thane Aaple Sarakar Seva Kendra Recruitment Vacancy Details 2026
पदांचा तपशील -
| अ. क्र. | क्षेत्र / संस्था | एकूण रिक्त सेवा केंद्रे |
|---|---|---|
| १ | ठाणे महानगरपालिका | २४५ |
| २ | कल्याण-डोंबिवली महानगरपालिका | १८८ |
| ३ | मिरा-भाईंदर महानगरपालिका | १२५ |
| ४ | भिवंडी-निजामपूर महानगरपालिका | १०५ |
| ५ | नवी मुंबई महानगरपालिका | ९२ |
| ६ | उल्हासनगर महानगरपालिका | ५१ |
| ७ | बदलापूर नगरपालिका | १४ |
| ८ | अंबरनाथ नगरपालिका | १२ |
| ९ | शहापूर | -- |
| १० | मुरबाड | -- |
| एकूण रिक्त सेवा केंद्रे | ८३२ | |
Thane Aaple Sarakar Seva Kendra Recruitment Education Details 2026
शैक्षणिक पात्रता -
- उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (HSC / १२ वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे (MS-CIT किंवा समकक्ष प्रमाणपत्रास प्राधान्य दिले जाईल).
- अर्जदार हा संबंधित महानगरपालिका किंवा नगरपालिका क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.
- अर्जदारास मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे.
- अर्जदाराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते आणि आवश्यक ओळखपत्रे उपलब्ध असावीत.
- अर्जदार नैतिक अधःपतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याबाबत दोषी ठरलेला नसावा. (निवड झाल्यानंतर १ महिन्याच्या आत पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.)
- अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबात ( पती, पत्नी व अविवाहित मुले/मुली) आधीपासून कोणतेही 'आपले सरकार सेवा केंद्र' सुरू नसावे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस केंद्र मिळण्यास पात्रता राहील.
- शासकीय, निमशासकीय, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी/कर्मचारी तसेच ग्रामपंचायत सदस्य किंवा लोकप्रतिनिधी यांना या केंद्रासाठी अर्ज करता येणार नाही.
- अर्जदार फक्त एकाच 'आपले सरकार सेवा केंद्रा'साठी अर्ज करू शकतो.
- किमान १०० चौ. फूट कार्यालयीन जागा असणे आवश्यक आहे.
- दोन संगणक/लॅपटॉप, लेझर प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण आणि वेबकॅम उपलब्ध असावेत.
- पॉवर बॅकअप (UPS), ब्रॉडबँड इंटरनेट (नागरी भागासाठी किमान २० Mbps) आणि CCTV व्यवस्था असणे आवश्यक आहे.
- शासनाने ठरवून दिलेले दरपत्रक केंद्रावर प्रसिद्ध करणे, विहित शुल्कातच सेवा देणे आणि ठरवलेल्या वेळेत केंद्र चालू ठेवणे बंधनकारक राहील.
- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अधिसूचित केलेल्या ठिकाणीच चालवावे लागेल; ठिकाण बदलल्यास केंद्र रद्द केले जाऊ शकते.
Thane Aaple Sarakar Seva Kendra Recruitment Age Limit Details 2026
वयाची अट - 01 सप्टेंबर 2026 रोजी
उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्षे पूर्ण असावे
वयाची सूट - जाहिरातीमध्ये कमाल वयोमर्यादेची कोणतीही अट दिलेली नाही
Thane Aaple Sarakar Seva Kendra Recruitment Exam Fee Details 2026
अर्जाची फी - फी नाही
अर्जाची पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन
नोकरी ठिकाण - ठाणे
Thane Aaple Sarakar Seva Kendra Recruitment Apply Online 2026
जाहिरात - Click Here
Online Apply लिंक - Click Here
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2026
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 01 ऑक्टोबर 2026
ऑफलाईन अर्ज पत्ता - संबंधित तालुका क्षेत्रातील 'निवासी नायब तहसीलदार' यांचे कार्यालय येथे सादर करावी
टीप :- Google Form द्वारे ऑनलाईन अर्ज भरून सबमिट केल्यानंतर तुमच्या ईमेलवर आलेल्या अर्जाची प्रिंट (Hard Copy) आणि स्व-साक्षांकित (Self-attested) कागदपत्रे ही तुमच्या संबंधित तालुका क्षेत्रातील 'निवासी नायब तहसीलदार' यांच्या कार्यालयातच नेऊन जमा करायची आहेत. दिनांक ०१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी अर्ज कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. कार्यालयीन वेळ ही (सकाळी ०९:४५ ते सायंकाळी ०६:१५ वाजेपर्यंत). राहील. अर्ज जमा करताना त्याची पोहोच पावती (Acknowledgment) नक्की घ्या.
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs
