Talathi Bharti Revised Merit List 2024 | तलाठी भरती सुधारीत गुणवत्ता यादी जाहीर

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वेबसाईटवर आज आपण महाराष्ट्र तलाठी भरती संदर्भात जाहीर करण्यात आलेल्या सुधारित गुणवत्ता यादी विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. 

Maharshtra Talathi Bharti Revised Merit List 2024
Maharshtra Talathi Bharti Revised Merit List 2024 {tocify} $title={Table of Contents}

Maharashtra Talathi Bharti Merit List Update 2024 

महाराष्ट्र तलाठी भरती संदर्भात टीसीएस कंपनीकडून परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये परीक्षेतील प्रश्नांबाबत आक्षेप घेण्यात आले होते. या आक्षेपांवर केलेल्या कार्यवाहीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी होऊन याचिका कर्त्याने सादर केलेल्या निवेदनातील तक्रारींचे निवारण करण्याचा आदेश माननीय उच्च न्यायालयाने १३ फेब्रुवारीला दिला होता.

Talathi Bharti Merit List New Update 2024 

तलाठी भरती परीक्षा ही एकूण ५७ शिफ्ट मध्ये १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीमध्ये घेण्यात आली होती. परीक्षा झाल्यानंतर टीसीएस कंपनीकडून २८ सप्टेंबर २०२३ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत प्रश्न / उत्तरांबाबत प्राप्त आक्षेपांचे पुन्हा पुनर्विलोकन करण्यात आले होते. 

त्यानुसार टीसीएस कंपनीकडून ७९ प्रश्नांमध्ये उत्तरसूची / प्रश्न यांबाबत घेतलेले आक्षेप बरोबर असल्याचे मान्य करण्यात आले आहे.

त्यानुसार आता प्रश्नोत्तर तालिकेतील एकूण २१९ प्रश्नांमध्ये / त्यांच्या उत्तर सूचीत बदल करण्यात येत आहे. एकूण ३९ प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहेत. तसेच १८० प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार उमेदवारांच्या “login” खात्यात योग्य ती सुधारणा करण्यात येत आहे.

तसेच प्रश्ननिहाय दुरुस्ती भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या २१९ प्रश्नांतील बदलानुसार गुणवत्ता यादी मध्ये बदल झाला आहे. 

त्यानुसार ३६ जिल्ह्यांच्या जिल्हानिहाय सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या काही उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात येत असून त्यांची जिल्हा निहाय यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे, असे प्रभारी राज्य परीक्षा समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

नवीन प्रसिद्धीपत्रक 
गुणवत्ता यादीबाबत - Click Here 

Talathi Bharti Revised Merit List 2024 

तलाठी भरती संदर्भात जिल्हा निहाय सुधारित गुणवत्ता यादी डाउनलोड करण्यासाठी आजच खालील लिंक ला भेट द्या

S.R. जिल्ह्याचे नाव डाउनलोड लिंक
1 अकोला Click Here
2 अमरावती Click Here
3 यवतमाळ Click Here
4 वाशिम Click Here
5 गडचिरोली Click Here
6 नागपूर Click Here
7 धुळे Click Here
8 गोंदिया Click Here
9 नाशिक Click Here
10 अहमदनगर Click Here
11 नांदेड Click Here
12 नंदुरबार Click Here
13 पालघर Click Here
14 पुणे Click Here
15 बीड Click Here
16 बुलढाणा Click Here
17 भंडारा Click Here
18 रायगड Click Here
19 मुंबई Click Here
20 मुंबई उपनगर Click Here
21 कोल्हापूर Click Here
22 रत्नागिरी Click Here
23 लातूर Click Here
24 वर्धा Click Here
25 सातारा Click Here
26 सांगली Click Here
27 सिंधुदुर्ग Click Here
28 सोलापूर Click Here
29 हिंगोली Click Here
30 परभणी Click Here
31 छत्रपती संभाजीनगर Click Here
32 चंद्रपूर Click Here
33 जळगांव Click Here
34 जालना Click Here
35 धाराशिव Click Here
36 ठाणे Click Here
37 राखीव निकाल यादी 1 Click Here
38 राखीव निकाल यादी 2 Click Here 
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here

Previous Post Next Post