Maharshtra ZP Bharti Important Instructions | महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर

Maharshtra ZP Bharti Important Instructions | महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर 

Maharashtra Zp bharti Important Instructions
Maharashtra Zp bharti Important Instructions 


Maharashtra Zp bharti Important Instructions :- महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती संदर्भात ग्रामविकास विभाग महाराष्ट्र ने सोमवारी दिनांक 15 मे 2023 रोजी एक नवीन शासन आदेश जाहीर केला असून त्यानुसार त्यांनी जिल्हापरिषदेतील गट क संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

जिल्हापरिषदेतील वाहनचालक व गट ड संवर्गातील पदे वगळून इतर सर्व पदे ही सरळसेवेने भरली जाणार आहे. याभरती संदर्भात नुकताच अभ्यासक्रम हा जाहीर केला होता. 

आता याभरती संदर्भात कोरोना काळामध्ये भरती प्रक्रिया राबविली गेली नसल्याने उमेदवारांच्या वयाच्या अटी संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतला असून यामध्ये उमेदवारांना 02 वर्षाची अतिरिक्त वयाची सूट त्यांनी जाहीर केली आहे.

या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय हे जास्तीत जास्त 40 वर्षे असले पाहिजे तर मागासवर्गीय प्रवर्गनिहाय उमेदवारांचे वय हे 45 पर्यंत असेल तर ते याभरती साठी अर्ज करू शकतात.

याभरती संदर्भात त्यांनी पेसा व बिगर पेसा असे दोन भाग त्यांनी केले आहे. यामध्ये अनुसूचित जमातीच्या क्षेत्राला पेसा असे संबोधले आहे यामध्ये पेसा क्षेत्रात स्थानिक अनुसूचित जमातीचे उमेदवार अर्ज करू शकतात.

सदर जाहिरातीमध्ये उमेदवाराचे वय हे दिनांक 01 जून 2023 रोजी गृहीत धरले जाणार आहे. तसेच ज्या उमेदवारांनी मार्च 2019 मध्ये अर्ज केला होता त्यांना सुद्धा यामध्ये काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

ज्या उमेदवारांनी मार्च 2019 मध्ये अर्ज केला व आज रोजी त्यांचे वय हे जाहिरात नुसार व शासन निर्णयानुसार अधिक असेल तरी देखील उमेदवारांना एक वेळेस ची विशेष संधी म्हणून त्यांना या परीक्षेला बसता येणार आहे. 

तसेच ज्यांनी मार्च 2019 जाहिरात नुसार अर्ज केला त्यानं पुन्हा नव्याने अर्ज करायचं आहे व त्यांना मार्च 2019 मध्ये अर्ज केला होता असा पर्याय त्यांना नव्याने अर्ज करताना निवडणे आवश्यक आहे. 

अधिक माहितीसाठी तुम्ही शासनाने जाहीर केलेला दिनांक 15 मे 2023 चा शासन निर्णय तुम्ही डाउनलोड करू शकता. हे डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा तुम्ही वापर करू शकता.

जिल्हा परिषद भरती 
मार्गदर्शक सूचना शासन आदेश - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here

Previous Post Next Post