Akola Aple Sarkar Seva Kendra Recruitment 2026: अकोला जिल्ह्यात ६१७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी भरती जाहीर

जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला (सेतू शाखा) अंतर्गत अकोला जिल्ह्यातील महानगरपालिका, तालुके, नगरपरिषद, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (ASSK) स्थापन करण्यासाठी ६१७ रिक्त ठिकाणांकरिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या एकत्रित सुधारित जाहिरातीची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे

Akola Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026
Akola Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  617 जागा 

Akola Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

अनुक्रमांक पदाचे नाव कार्यक्षेत्र एकूण जागा Apply लिंक
१ आपले सरकार सेवा केंद्र चालक (ASSK Operator) अकोला जिल्हा (महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायत क्षेत्र) ६१७ Apply Online
    

Akola Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

​१. अर्जदार किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (HSC / १२ वी) उत्तीर्ण असावा. पदवी, पदविका किंवा उच्च व्यावसायिक पात्रतेस अतिरिक्त गुण दिले जातात.

२. संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक असून, MSCIT किंवा समकक्ष प्रमाणपत्र आणि सायबर सुरक्षेचे ज्ञान असावे.

३. अर्जदार हा संबंधित ग्रामपंचायत / नगरपालिका / नगरपंचायत क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असावा. आधार कार्डवरील पत्ता वास्तव्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल.

४. अर्जदाराकडे स्वतःची किंवा भाड्याची किमान १०० चौ. फूट स्वतंत्र कार्यालयाची जागा आणि संगणक, प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, इंटरनेट, सीसीटीव्ही इत्यादी तांत्रिक सुविधा असणे बंधनकारक आहे.

५. व्यवसाय चालविण्यासाठी आवश्यक गुंतवणूक करण्याची व किमान ६ ते १२ महिने व्यवसाय चालविण्याची आर्थिक क्षमता असावी.

६. अर्जदार नैतिक अधःपतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याबाबत दोषी ठरलेला नसावा व गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारी व्यक्ती अपात्र राहील.

७. एका कुटुंबातील (स्वयं, पती/पत्नी, आई/वडील, अविवाहित मुले) केवळ एकच व्यक्ती अर्ज करण्यास पात्र असेल आणि यापूर्वी केंद्र सुरू असलेली व्यक्ती अर्ज करू शकणार नाही. 

Akola Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - दिनांक 05 नोव्हेंबर 2026 रोजी 

अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे

Akola Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  500 ₹ /- 

नोकरी ठिकाण - अकोला

Akola Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 नोव्हेंबर 2026


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post