ठाणे जिल्हा कोतवाल भरती 2026 : महसूल सेवक पदाच्या १११ जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

ठाणे जिल्ह्यातील शासकीय सेवेत रुजू होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे (उपविभागीय अधिकारी कार्यालय उल्हासनगर) अंतर्गत ठाणे, कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी आणि शहापूर या तालुक्यांतील विविध महसूल सझांमध्ये महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील एकूण १११ रिक्त पदांच्या सरळसेवा भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.  

Thane Kotwal Bharti 2026
Thane Kotwal Bharti 2026


​जर तुम्ही ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असाल आणि शासकीय नोकरीच्या शोधात असाल, तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची संधी आहे. या भरतीची शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, तालुकानिहाय पदसंख्या, अर्ज शुल्क आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.

{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  111 जागा 

Abc Recruitment Vacancy Details 202 


पदांचा तपशील -

अ. क्र. तहसील कार्यालयाचे नाव (तालुका) रिक्त पदसंख्या
१ तहसील कार्यालय ठाणे २४
२ तहसील कार्यालय भिवंडी (पेसा व नॉन-पेसा) १४
३ तहसील कार्यालय कल्याण १४
४ तहसील कार्यालय अंबरनाथ २१
५ तहसील कार्यालय मुरबाड (पेसा व नॉन-पेसा) १९
६ तहसील कार्यालय शहापूर (पेसा व ० ते २५% पेसा) १९
एकूण पदे १११
    

Abc Recruitment Education Details 202 



शैक्षणिक पात्रता  - 


​१. उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

​२. उमेदवारास मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असणे अनिवार्य आहे.  

​३. अर्जदार ज्या तालुक्यातील महसूल सजेच्या पदासाठी अर्ज करत आहे, तो त्याच तालुक्यातील मूळ रहिवासी असणे बंधनकारक आहे (तहसीलदार यांचा रहिवाशी दाखला आवश्यक).

​४. निवडीनंतर उमेदवाराला संबंधित महसूल सजेच्या ठिकाणीच वास्तव्य करणे बंधनकारक राहील.

​५. उमेदवार महसूल सेवक पदाची कर्तव्ये पार पाडण्यास शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम असावा (वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक).

​६. उमेदवाराविरुद्ध कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झालेली नसावी व चारित्र्य निष्कलंक असल्याबाबत संबंधित पोलीस स्टेशनचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.

​७. उमेदवारास लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र (नमुना 'अ') सादर करणे बंधनकारक आहे.

​८. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांकडे सक्षम प्राधिकाऱ्यांचे वैध जात प्रमाणपत्र आणि लागू असल्यास सन २०२६-२७ साठी वैध असलेले नॉन-क्रिमीलेअर किंवा EWS प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.

Abc Recruitment Age Limit Details 202 


वयाची अट - 01 ऑक्टोबर 2026 रोजी

किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे 

Abc Recruitment Exam Fee Details 202 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 600 ₹/- 

राखीव प्रवर्ग - 500 ₹/- 

नोकरी ठिकाण - ठाणे

Abc Recruitment Apply Online 202 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 ऑक्टोबर 2026 रोजी ( सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत ) 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post