MSRTC Dharashiv Apprentice Recruitment 2026 | 140 जागा | ITI + Diploma + Degree उमेदवारांना संधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC), धाराशिव विभागामार्फत शिकाऊ उमेदवारांसाठी (Apprentice) १४० जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSRTC Dharashiv Apprentice Bharti 2026
MSRTC Dharashiv Apprentice Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  140 जागा 

MSRTC Dharashiv Apprentice Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

अनुक्रमांक पदाचे / ट्रेडचे नाव एकूण रिक्त जागा
यांत्रिक मोटार गाडी (MMV) ६०
मेकॅनिक डिझेल १४
मेकॅनिक ऑटोइलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स ०५
शीट मेटल वर्क्स / पंजेकारागीर २२
वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिकल) १०
विजतंत्री / इलेक्ट्रिशियन २०
अपहोल्स्टर ०२
टर्नर ०२
पेंटर (जनरल) ०३
१० अभियांत्रिकी पदविका (Mechanical / Automobile Diploma) ०१
११ अभियांत्रिकी पदवी (Mechanical / Automobile Degree) ०१
एकूण रिक्त जागा  १४०
    

MSRTC Dharashiv Apprentice Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

पद क्रमांक 1 ते 9 :- 

  1. १० वी (SSC) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 
  2. उमेदवाराने सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) संबंधित ट्रेडमधील प्रमाणपत्र (उदा. MMV, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, शीट मेटल, वेल्डर, अपहोल्स्टर, टर्नर, पेंटर इत्यादी) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. 
पद क्रमांक 10 :- 

मान्यताप्राप्त संस्थेतून मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधील पदविका (Diploma) उत्तीर्ण असावी. शैक्षणिक वर्ष २०२३ ते २०२६ दरम्यान उत्तीर्ण झालेले उमेदवारच या अर्जासाठी पात्र असतील.

पद क्रमांक 11 :- 

मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधील पदवी (Degree) परीक्षा उत्तीर्ण असावी. शैक्षणिक वर्ष २०२३ ते २०२६ दरम्यान उत्तीर्ण झालेले उमेदवारच या अर्जासाठी पात्र असतील. 

MSRTC Dharashiv Apprentice Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट -

१. अभियांत्रिकी पदवी व पदविका (Degree / Diploma) उमेदवारांसाठी : - 

​कमाल वयोमर्यादा : २० ऑगस्ट २०२६ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.  

​२. ITI उमेदवारांसाठी :- 

​उमेदवाराचे वय २० ऑगस्ट २०२६ रोजी किमान १८ वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे.   

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील 

MSRTC Dharashiv Apprentice Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग (Open Category) :- 

रु. ५००/- + १८% GST = एकूण रु. ५९०/-

मागासवर्गीय प्रवर्ग (Reserved Category) :- 
रु. २५०/- + १८% GST = एकूण रु. २९५/-

शुल्क भरण्याची पद्धत व महत्त्वाच्या अटी :- 

पेमेंट माध्यम :- अर्ज शुल्कासाठी राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट (Demand Draft - DD) किंवा पोस्टल ऑर्डर (Postal Order) काढावा.
 
कोणाच्या नावे डीडी काढावा :- MSRTC FUND ACCOUNT PAYABLE AT OSMANABAD या नावे डीडी अथवा पोस्टल ऑर्डर काढणे आवश्यक आहे.

डीडीमागील माहिती :- डिडी किंवा पोस्टल ऑर्डरच्या पाठीमागे उमेदवाराने स्वतःचे पूर्ण नाव आणि अर्ज केलेल्या पदाचे/ट्रेडचे नाव लिहिणे बंधनकारक आहे.

जातीचा दाखला :- मागासवर्गीय उमेदवारांनी सवलतीचा लाभ घेण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
 
नॉन-रिफंडेबल :- उमेदवाराने जमा केलेले भरती प्रक्रिया शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.


नोकरी ठिकाण - धाराशिव

MSRTC Dharashiv Apprentice Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here

अर्ज पद्धत - ऑफलाईन व ऑनलाईन

Apply Link :- 

अनुक्रमांक पदाचे / ट्रेडचे नाव ऑनलाईन अर्ज लिंक (Apply Link)
यांत्रिक मोटार गाडी (Mechanic Motor Vehicle) इथे क्लिक करा (Apply Online)
मेकॅनिक डिझेल (Mechanic Diesel) इथे क्लिक करा (Apply Online)
मेकॅनिक ऑटोइलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इथे क्लिक करा (Apply Online)
शीट मेटल वर्क्स (Sheet Metal Worker) इथे क्लिक करा (Apply Online)
वेल्डर - गॅस अँड इलेक्ट्रिकल (Welder) इथे क्लिक करा (Apply Online)
विजतंत्री (Electrician) इथे क्लिक करा (Apply Online)
अपहोल्स्टर (Upholsterer) इथे क्लिक करा (Apply Online)
टर्नर (Turner) इथे क्लिक करा (Apply Online)
पेंटर - जनरल (Painter) इथे क्लिक करा (Apply Online)
१० अभियांत्रिकी पदविका (Mechanical / Automobile Diploma) इथे क्लिक करा (NATS Portal)
११ अभियांत्रिकी पदवी (Mechanical / Automobile Engineering) इथे क्लिक करा (NATS Portal)
 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 सप्टेंबर 2026 


ऑफलाईन अर्ज पत्ता - डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, रा.प. विभागीय कार्यालय, धाराशिव - 413501

टीप :- ऑनलाईन अर्ज करून विभागीय कार्यालयात यशस्वीरीत्या कागदपत्रे जमा केलेल्या सर्व उमेदवारांची मुळ कागदपत्र तपासणी (Document Verification) १० सप्टेंबर २०२६ रोजी केली जाईल.  



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post