अमरावती मनपा क्षेत्रात १२ वी पासवर नोकरीची सुवर्णसंधी बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अमरावती शहर पूर्व अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांच्या १३ जागांसाठी अर्ज मागवले आहेत. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत होणार नसून निवड थेट गुणवत्तेवर केली जाईल.
पात्र महिला उमेदवारांनी १७ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑफलाईन अर्ज सादर करावेत. या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 13 जागा
Amravati Anganwadi Sevika Madatnis Recruitment Vacancy Details 2026
पदांचा तपशील -
| अनुक्रमांक | पदाचे नाव | एकूण जागा |
|---|---|---|
| १ | अंगणवाडी सेविका (उर्दू भाषिक) | ०२ |
| २ | अंगणवाडी मदतनीस (मराठी भाषिक) | १० |
| ३ | अंगणवाडी मदतनीस (उर्दू भाषिक) | ०१ |
| एकूण जागा: | १३ | |
Amravati Anganwadi Sevika Madatnis Recruitment Education Details 2026
शैक्षणिक पात्रता - उमेदवाराने किमान इयत्ता १२ वी (माध्यमिक शाळा परीक्षा) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (माध्यमिक शालांत परीक्षेत पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण नसल्यास शैक्षणिक गुण सरासरी ३५% ग्राह्य धरले जातील).
स्थानिक भाषेचे ज्ञान :-
- मराठी भाषिक पदासाठी :- इयत्ता १० वी ला मराठी विषय असणे अनिवार्य.
- उर्दू भाषिक पदासाठी :- उमेदवाराला उर्दू भाषा लिहिणे व वाचणे येणे आवश्यक आहे.
स्थानिक रहिवासी अट :-
- उमेदवार हा बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अमरावती शहर पूर्व अंतर्गत क्षेत्रातील स्थानिक रहिवासी असावा (तहसीलदार रहिवासी दाखला, डोमेसाईल, गॅसकार्ड, लाईट बिल, आधार कार्ड किंवा मतदान कार्ड पुरावा म्हणून जोडणे आवश्यक).
इतर अतिरिक्त अर्हता :-
- पदवी, पदव्युत्तर पदवी, D.El.Ed, B.Ed किंवा MSCIT/संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास अतिरिक्त गुण दिले जातील.
Amravati Anganwadi Sevika Madatnis Recruitment Age Limit Details 2026
वयाची अट -
किमान वय :- जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे.
कमाल वय :- सर्वसाधारण उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे राहील.
विधवा उमेदवार सवलत :- विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे पर्यंत राहील.
वय सिद्धतेचे पुरावे :- वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला (TC) किंवा १० वीचे बोर्ड प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे.
लहान कुटुंबाची अट :- जाहिरातीनुसार उमेदवारास जास्तीत जास्त २ हयात अपत्ये असावीत (२ पेक्षा जास्त अपत्ये असल्यास उमेदवार अपात्र ठरेल).
Amravati Anganwadi Sevika Madatnis Recruitment Exam Fee Details 2026
अर्जाची फी - या भरतीसाठी अर्ज सादर करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. उमेदवारांना विहित नमुन्यातील अर्ज मोफत जमा करता येईल
नोकरी ठिकाण - अमरावती
Amravati Anganwadi Sevika Madatnis Recruitment Apply Offline 2026
जाहिरात व ऑफलाईन अर्ज नमुना - Click Here
अर्ज पत्ता - बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अमरावती शहर पूर्व, दत्त पॅलेस, पहिला मजला, गांधी चौक, अमरावती - ४४४६०१
अर्ज करण्याची शेवटची तारीख - ०२ सप्टेंबर २०२६ ते १७ सप्टेंबर २०२६ फक्त कार्यालयीन वेळेत सकाळी १०:३० ते सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत (फक्त कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
टीप :- अर्ज विहित नमुन्यात पूर्ण भरून, आवश्यक कागदपत्रांच्या स्व-साक्षांकित (Self-attested) प्रती जोडणे बंधनकारक आहे.
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs
