आपल्या गावात किंवा शहरात स्वतःचा अधिकृत डिजिटल सेवा केंद्र सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायती आणि नागरी क्षेत्रांमध्ये नवीन 'आपले सरकार सेवा केंद्र' (CSC/VLE) वितरीत करण्यासाठी अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
![]() |
| Pune Aaple Sarakar Seva Kendra Bharti 2026 |
जर तुम्ही किमान १२ वी उत्तीर्ण असाल आणि संगणकाचे ज्ञान असेल, तर तुम्ही या केंद्रासाठी अर्ज करू शकता. या पोस्टमध्ये आपण अर्ज करण्याची मुदत, आवश्यक पात्रता, लागणारी कागदपत्रे आणि निवड प्रक्रिया याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तर पाहणार आहोत.
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 1400 जागा
Pune Aaple Sarakar Seva Kendra Recruitment Education Details 2026
शैक्षणिक पात्रता -
१. अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
२. अर्जदार किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (HSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
३. अर्जदाराने MSCIT किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (NIELIT) संस्थेमार्फत राबविलेला Course on Computer Concept (CCC) हा कोर्स किंवा समकक्ष प्रमाणपत्र किंवा संगणक अभ्यासक्रमाची पदविका/पदवी/पदव्युत्तर प्रगत पदविका उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
४. अर्जदाराकडे स्वतःचे PAN कार्ड, आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक असणे व सदर कागदपत्रे अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.
५. अर्जदार हा जाहिरातीतील नमूद संबंधित ग्रामपंचायतीच्या भौगोलिक क्षेत्रातील स्थानिक रहिवासी असावा. रहिवास पत्त्याचा पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणतेही दोन पुरावे जोडणे आवश्यक आहे (सर्व कागदपत्रांवरील पत्ता एकच असावा).
६. अर्जदार हा नैतिक अधःपतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याबाबत दोषी ठरलेला नसावा.
७. अर्जदारास मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे.
८. परिपूर्ण भरलेला अर्ज संबंधित गावाच्या महसूली उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयामध्ये दिलेल्या मुदतीत व वेळेत समक्ष सादर करावा. मुदतीनंतर, पोस्ट, कुरिअर, ई-मेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
९. जाहिरात दिनांकावेळी कार्यरत असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रचालकांना नवीन केंद्रासाठी अर्ज करता येणार नाही.
१०. कायमस्वरूपी केंद्र बंद करण्यात आलेल्या जुन्या केंद्रचालकांना नवीन केंद्रासाठी अर्ज करता येणार नाही.
११. केंद्र व राज्य शासनाचे शासकीय/निमशासकीय/सार्वजनिक उपक्रम/महामंडळे यांमधील कार्यरत व कंत्राटी अधिकारी/कर्मचारी अर्ज करू शकत नाहीत.
१२. विवाहित महिलांनी पॅनकार्डवरील नावानुसार व विवाहानंतरच्या पत्त्यानुसार एकच अर्ज करावा. नावात बदल असल्यास गॅझेट किंवा विवाह दाखला जोडणे आवश्यक आहे.
१३. अर्जदार स्वतःच्या रहिवासी ग्रामपंचायतीच्या यादीत नमूद जागेसाठी एकच अर्ज करू शकतो. यादीत नसलेल्या ठिकाणासाठी किंवा एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास अर्ज बाद केला जाईल.
१४. अपूर्ण, चुकीची माहिती असलेले किंवा आवश्यक कागदपत्रांशिवाय प्राप्त झालेले अर्ज पूर्वसूचना न देता अपात्र ठरवले जातील.
१५. यापूर्वी सादर केलेले जुने अर्ज विचारात घेतले जाणार नसून, अद्ययावत माहितीसह विहीत नमुन्यात नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे.
१६. निवड प्रक्रियेदरम्यान अधिकारी/कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास अर्जदारास अपात्र केले जाईल.
१७. अर्जात चुकीची/खोटी माहिती किंवा बनावट कागदपत्रे आढळल्यास, तसेच काळ्या यादीत समावेश किंवा गुन्हे प्रलंबित असल्यास अर्जदार अपात्र ठरेल.
१८. केंद्रामध्ये किमान २ संगणक/लॅपटॉप, लेझर प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, वेबकॅम, UPS/वीज बॅकअप, ब्रॉडबँड (ग्रामीण ५० Mbps), CCTV, प्रतीक्षाकक्ष व दरपत्रक फलक असणे आवश्यक आहे.
१९. एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास १०० गुणांच्या निकषांवर आधारलेले मूल्यमापन (शैक्षणिक, संगणक ज्ञान, पायाभूत सुविधा, मुलाखत, अनुभव इ.) केले जाईल.
२०. एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास जिल्हास्तरीय समितीमार्फत २० गुणांची मुलाखत घेतली जाईल.
२१. अर्जदाराने पोलीस विभागाचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (Police Verification Certificate) सादर करणे बंधनकारक आहे.
२२. निवड झालेल्या VLE सोबत प्रारंभी ३ वर्षांचा करार केला जाईल; पुढील नूतनीकरण कामकाजाच्या कामगिरीवर (Performance KPIs) अवलंबून असेल.
२३. मंजूर झालेले केंद्र दुसऱ्या व्यक्तीस चालविण्यास देता येणार नाही.
२४. केंद्राकरिता कोणत्याही शासकीय परिसरामध्ये जागा मिळणार नाही.
२५. नवीन केंद्र वाटपासाठी कोणतीही शासकीय फी नसून ही प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे.
२६. प्रशासकीय कारणास्तव जाहिरात प्रक्रिया स्थगित, रद्द किंवा वेळापत्रकात बदल करण्याचे अधिकार अध्यक्ष, जिल्हा सेतू समिती तथा जिल्हाधिकारी, पुणे यांना राहतील.
२७. जाहिरातीत नमूद ठिकाणीच केंद्र मंजूर होईल आणि केंद्रांच्या संख्येत वाढ/घट करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे राहतील.
२८. एका जागेसाठी एकच अर्ज पात्र ठरल्यास किंवा एकापेक्षा जास्त पात्र असल्यास गुणवत्तेवर केंद्र वितरीत करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे राहतील.
२९. प्राथमिक निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अर्जदार केवळ स्वतः अर्ज केलेल्या ग्रामपंचायतीच्या अर्जावरच हरकत घेऊ शकेल.
३०. एका कुटुंबातून एकाच व्यक्तीस अर्ज सादर करता येईल.
Pune Aaple Sarakar Seva Kendra Recruitment Age Limit Details 2026
वयाची अट - अर्जदाराचे वय हे किमान 18 वर्षे पूर्ण असावे
Pune Aaple Sarakar Seva Kendra Recruitment Exam Fee Details 2026
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - पुणे
Pune Aaple Sarakar Seva Kendra Recruitment Apply Offline 2026
जाहिरात - Click Here
अटी व शर्ती - Click Here
अर्ज जमा केल्याची पावती - Click Here
अर्ज नमुना - Click Here
जुन्नर तालुका शुद्धिपत्रक - Click Here
अर्ज पत्ता -
ऑफलाईन अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांनी त्यांच्या संबंधित महसूली उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयात समक्ष जावून अर्ज सादर करावा लागेल
- मावळ व मुळशी तालुक्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, मावळ-मुळशी
- भोर व राजगड तालुक्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, भोर-राजगड
- बारामती व इंदापूर तालुक्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, बारामती
- जुन्नर व आंबेगाव तालुक्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, जुन्नर-आंबेगाव (मंचर)
- शिरुर व पुणे शहर तालुक्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, पुणे शहर
- हवेली तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, हवेली
- दौंड तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, दौंड
- पुरंदर तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, पुरंदर
- खेड तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, खेड
(टीप: पोस्ट, कुरिअर, ई-मेल द्वारे पाठवलेले अर्ज किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात थेट पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 ऑगस्ट 2026
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs
