Mahajyoti Free Tablet Scheme 2025|महाज्योति मार्फत इयत्ता दहावी पास विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखात मी तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती घेऊन आलो आहे. महाज्योति मार्फत इयत्ता दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना टॅबलेट चे मोफत वितरण केले जाणार आहे. 

हा टॅबलेट कोणत्या विद्यार्थ्यांना वाटप केला जाईल, त्याच्या अटी व शर्ती काय राहील ? , याबाबत आजच्या या लेखात आपण जाणून घेऊया.

Mahajyoti Free Tablet Scheme 2025
Mahajyoti Free Tablet Scheme 2025 



{tocify} $title={Table of Contents}


Mahajyoti Free Tablet Scheme  Details 2025 

महाज्योति मार्फत इयत्ता दहावी पास झालेल्या तसेच MHT-CET/JEE/NEET साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅबलेट चे वितरण केले जाणार आहे.

महाज्योति मोफत टॅबलेट वितरण योजनेसाठी आवश्यक अटी व शर्ती 

1) उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/असावी

2) उमेदवार हा इतर मागासवर्गीय किंवा विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी

3) उमेदवार हा नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा/असावी

4) जे विद्यार्थी सन 2025 मध्ये दहावीची परीक्षा पास झालेले आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश पत्र म्हणजेच बोनाफाईड सर्टिफिकेट व दहावीची मार्कशीट जोडावी.

5) विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सूचनानुसार अपलोड करणे आवश्यक आहे.

6) विद्यार्थ्याची निवड ही त्यांना 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल.

7) विद्यार्थ्यांची निवड ही त्याच्या इयत्ता 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल

8) इयत्ता १० वी मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थांना किमान ६० % व शहरी भागातील विद्यार्थांना किमान 
७० % गुण असणे गरजेचे आहे. 


Abc Recruitment Education Details 202 

महाज्योति मोफत टॅबलेट वितरण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे 
1) 10 वी ची गुणपत्रिका
2) 11 वी सायन्स घेतल्याचे प्रवेश पत्र (बोनाफाईड सर्टिफिकेट)
3) आधार कार्ड (पुढील व मागील बाजूसहित)
4) रहिवाशी दाखला/डोमासाईल सर्टिफिकेट (Domicile Certificate)
5) जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
6) वैध नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट (Non Creamy Layer Certificate)
7) दिव्यांग असल्यास दाखला
8) अनाथ असल्यास दाखला

Mahajyoti Free Tablet Scheme Apply Details 2025 

महाज्योति मार्फत मोफत टॅबलेट योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करताना खालील दिलेल्या लिंक चा वापर करावा. 

यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 मे 2025 आहे. 

महाज्योति मोफत टॅबलेट योजनेसाठी 
अर्ज करण्यासाठी Apply लिंक  - Click Here 

महाज्योति मोफत टॅबलेट 
योजना जाहिरात - Click Here 

 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post