Maharashtra Talathi Bharti Answer Key Update 2023
महाराष्ट्र राज्यात तलाठी भरतीची 4644 जागांची जाहीरात ही 23 जून 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज हे 26 जून पासून 25 जुलै 2023 पर्यंत मागविण्यात आले होते.
सदर तलाठी भरती करिता परीक्षा ही 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 दरम्यान घेण्यात आली होती. या कालावधी मध्ये परीक्षा ही 19 दिवस घेण्यात आली होती.
{tocify} $title={Table of Contents}
Talathi Bharti Answer Key Update 2023
तलाठी भरतीची परीक्षा ही एकूण 19 दिवसांमध्ये एकूण 57 शिफ्ट मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी या संबंधी उमेदवारांच्या लॉगिन मध्ये Answer Key उपलब्ध करून दिली जाणार आहे.
उमेदवारांना ही Answer Key 28 सप्टेंबर ते 08 ऑक्टोबर 2023 या दरम्यान बघता येणार आहे. उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या Answer Key मध्ये काही चुका / प्रश्नाचे पर्याय चुकीचे आढळून आल्यास त्यावर विद्यार्थ्यांना आक्षेप घेण्याचा पर्याय यामध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे.
$ads={1}
उमेदवारांना आक्षेप / हरकती सादर करण्यासाठी प्रति आक्षेप 100 रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहे. आक्षेप योग्य आढळून आल्यास संबंधित आक्षेप फी परत केली जाणार आहे.
तसेच आक्षेप अयोग्य आढळून आल्यास ती फी परत खेळू जाणार नाही असे त्यांनी दिलेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे.
$ads={2}
उमेदवारांकडून नोंदविण्यात आलेले आक्षेप टीसीएस कंपनीच्या समितीकडे जातील. या समितीकडून प्राप्त आक्षेपांचे निरसन केले जाणार आहे.
तलाठी गट क संवर्गाची परीक्षा ही 57 शिफ्ट मध्ये घेण्यात आली असून यानुसार प्रत्येक शिफ्ट ची काठिण्य पातळी ही वेगवेगळी असल्याने त्याचे Normalisation केले जाणार आहे. Normalisation नंतर उमेदवारांचे गुण निश्चित करून राज्याची मेरिट लिस्ट तयार केली जाणार व नंतर त्याचा निकाल प्रसिद्ध केले जाणार आहे.
Maharashtra Talathi Bharti
Answer Key Notice - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Updates