महाराष्ट्रातील शिक्षक भरतीला सापडला नवीन मुहूर्त !|Maharshtra Teacher Recruitment New Update 2023
![]() |
Maharshtra Teacher Bharti Update 2023 |
महाराष्ट्र :- अडीच लाख उमेदवारांना प्रतीक्षा असलेल्या शिक्षक भरतीचा मुहूर्त अखेर प्रशासनाला सापडला आहे.
या भरतीचा मुहूर्त हा ऑगस्ट महिन्यात निघाला आहे.
सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांची संचमान्यता 15 मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार असुन त्यानंतर शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल हे सुरू केले जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक संचालक शरद गोसावी यांनी केली आहे.
2023 मध्ये फेब्रुवारी व मार्च महिन्यांत शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी घेतली होती. याचा निकाल हा दिनांक 24 मार्च रोजी जाहीर केला पण त्या दिवसापासून आज जवळपास 2 महिने झाले परंतु यावर पुढे कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने सर्व उमेदवार हे अस्वस्थ झाले आहे.
यासंदर्भात उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे शासनाला या भरतीचे नियोजन हे लवकरच करणे आवश्यक आहे. या भरती साठी 17 एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे ही भरती अतिशय वेगवान पद्धतीने राबविणे आवश्यक आहे.
भरती प्रक्रियेतील महत्वाचे टप्पे
- सध्या कार्यरत शिक्षकांची संचमान्यता १५ मे 2023 पर्यंत अंतिम केली जाईल
- दिनांक २० मे 2023 पर्यंत शाळानिहाय अंतिम संचमान्यता वितरित होतील
- या संचमान्यतेतील मंजूर पदानुसार पदभरती साठी आवश्यक कार्यवाही सुरू केली जाईल
- व्यवस्थापनांच्या शिक्षक पदांची बिंदुनामावली ३० जून 2023 पर्यंत प्रमाणित केली जाईल
- संबंधित व्यवस्थापनाच्या रिक्त पदांची जाहिरात १५ जुलैपर्यंत पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल
- २० ऑगस्ट 2023 पर्यंत उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरणे, नियुक्तीसाठी शिफारस करणे
- या दरम्यानच्या काळातच दुसऱ्या तिमाहीकरिता शिक्षकांच्या रिक्त पदांची पोर्टलवर नाेंद करणे
अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन माहिती वाचू शकता - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |