अमरावती जिल्ह्यात नवीन आधार केंद्रासाठी अर्ज सुरू |Amravati Aadhar Seva Kendra Recruitment 2026

अमरावती जिल्ह्यात 18 नवीन आधार नोंदणी केंद्रांसाठी अर्ज मागविण्यात आले

Aadhar Seva Kendra Amravati Bharti 2026
Aadhar Seva Kendra Amravati Bharti 2026

अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना आधार नोंदणी व अद्ययावत सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या वतीने नवीन आधार नोंदणी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. या अंतर्गत जिल्ह्यातील रिक्त ठिकाणी एकूण 18 नवीन आधार नोंदणी केंद्रांचे वाटप करण्यात येणार आहे.

अर्ज कोण करू शकतो ?


या प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मान्यता प्राप्त व सध्या कार्यरत असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र सेवा केंद्र चालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अर्ज स्वीकारण्याची कालावधी 


आधार नोंदणी केंद्रासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया दि. 31 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार असून दि. 09 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. विहित कालावधीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

कोणत्या ठिकाणी नवीन आधार केंद्रे सुरू होणार


अमरावती जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील वलगांव, आसरा, मंगरूळ चव्हाळा, लोणी, घुईखेड, जुना धामणगाव, वऱ्हा, हिवरखेड, पुसला, बेलोरा, रासेगाव, वडनेर गंगाई, भंडारज, धुलघाट, हरिसाल, गौलखेडा आणि टेंब्रुसोंडा या ठिकाणी नवीन आधार नोंदणी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

इच्छुकांनी संधीचा लाभ घ्यावा


आधार सेवा विस्तारासाठी ही एक महत्त्वाची संधी असून पात्र आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी वेळेत अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात व अर्ज नमुना आजच डाउनलोड करा 


अमरावती जिल्ह्यातील सुरु असलेल्या 
आपले सरकार सेवा केंद्र चालकांकरीता 
आधार केंद्र वाटपाबाबत 
जाहिरात व नमुना अर्ज - Click Here

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post