महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत राज्य पोलीस दलातील विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने आज दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी शासन निर्णय काढून मान्यता दिली आहे. चला तर मित्रांनो जाणून घेऊया अधिक माहिती.
![]() |
Maharshtra Police Bharti Update 2025 |
{tocify} $title={Table of Contents}
Maharashtra Police Bharti Recruitment Update 2025
महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह पोलीस दलातील कारागृह शिपाई या संवर्गातील सन 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 व 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधी मध्ये रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत दिनांक 12 ऑगस्ट रोजी शिक्का मोर्तब करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. गृह विभागाने काढलेल्या नव्या शासन निर्णयानुसार पोलीस दल आणि कारागृह विभागातील एकूण 15,631 पदांची भरती होणार आहे.
कोणत्या जागा रिक्त ?
- पोलीस शिपाई – 12,399
- पोलीस शिपाई चालक – 234
- बॅण्डस्मन – 25
- सशस्त्र पोलीस शिपाई – 2,393
- कारागृह शिपाई – 580
परीक्षा व प्रक्रिया
भरती प्रक्रिया OMR आधारित लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचण्यांद्वारे होणार आहे. याशिवाय घटकस्तरावर (component-level) स्वतंत्र भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
- खुला प्रवर्ग अर्ज शुल्क – ₹४५०
- मागास प्रवर्ग अर्ज शुल्क – ₹३५०
वयोमर्यादा ओलांडलेल्यांना दिलासा
सन 2022 आणि 2023 मध्ये वयोमर्यादा पूर्ण झालेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष संधी या भरतीत दिली जाणार आहे.
पारदर्शकता व जबाबदारी
भरतीची सर्व जबाबदारी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे सोपवली आहे. उमेदवारांच्या अर्जांपासून ते निकालापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी बाह्य सेवा पुरवठादार कंपन्यांचा वापर करण्याचीही परवानगी देण्यात आली आहे.
तरुणांसाठी मोठी संधी
राज्यातील हजारो तरुण-तरुणींना पोलीस व कारागृह सेवेत रुजू होण्याची संधी मिळणार असून या निर्णयामुळे कायदा व सुव्यवस्था आणखी सक्षम होण्यास मदत होणार आहे.
👉 अधिकृत अधिसूचना व अर्जाची माहिती लवकरच पोलीस भरती पोर्टलवर प्रसिद्ध होणार आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणा-या भरती
प्रक्रियेस मान्यता देणेबाबत
शासननिर्णय डाउनलोड लिंक - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Updates