Maharashtra ZP Recruitment Update 2023| महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती Update 2023
![]() |
Maharashtra ZP Recruitment Update 2023 |
Maharashtra ZP Recruitment Update 2023 :
महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती संदर्भात एक परिपत्रक हे ग्रामविकास विभागातर्फे प्रसारित करण्यात आले आहे. त्या परिपत्रकात असलेल्या माहिती विषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहे.
ZP Bharti Exam Dates and Other Important Dates 2023
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांमधील 18939 रिक्त जागा भरण्यासाठी IBPS या कंपनी सोबत करार अंतिम टप्यावर आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत 2023 मध्ये 15 ऑगस्ट 2023 च्या आधी 18939 रिक्त पदांसाठी ZP Recruitment 2023 लवकरच घेतली जाणार आहे.
ही भरती दोन टप्प्यात घेतली जाणार आहे.पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवेशी निगडीत पदे आणि दुसरा टप्प्यात जिल्हा परिषदांमधील गट ब आणि गट क संवर्गातील इतर पदे भरली जाणार आहेत.
Zilla Parishad Recruitment 2023|Post List 2023
या भरती साठी IBPS कंपनी Application पोर्टल विकसित करत आहे. याबद्दल माहिती प्रदान करण्यात आली आहे तसेच प्रत्येक जिल्हा परिषदांना सूचना देण्यात आल्या आहेत.
आरोग्य सेवेशी निगडीत पदांमध्ये आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक, आरोग्सेयविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषधनिर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या 05 संवर्गातील रिक्त पदांचा समावेश होतो.
दुसऱ्या टप्प्यात भरल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांमधील गट ब आणि गट क संवर्गातील पदांमध्ये कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक. वरिष्ठ सहायक (लेखा), अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक आणि विस्तार अधिकारी या संवर्गातील पदांचा समावेश होतो.
ZP Recruitment 2023 | जिल्हा परिषद भरती 2023
जिल्हा परिषद भरती 2023 ची परीक्षा आय.बी.पी.एस. या कंपनी द्वारे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यासाठी, IBPS कंपनीसोबत बैठका घेऊन करार (MOU) येत्या आठवड्यात पूर्ण होणार आहे.
या संबंधी मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामविकास विभाग यांचे 12 एप्रिल 2023 रोजी एक पत्रक जाहीर झाले आहे.
जर तुम्हाला हे परिपत्रक बघायचे किंवा डाउनलोड करायचे असेल तर खालील लिंक ला क्लीक करून वाचू शकता.
ग्रामविकास विभाग
जिल्हा परिषद भरती
संदर्भातील परिपत्रक लिंक - Click Here
सर्व जिल्हा परिषदांना सदर पदभरतीबाबत संक्षिप्त टिप्पणी /प्रेसनोट तयार करण्याचे सांगण्यात आले आहे. ज्यामध्ये शासनस्तरावर सदर पदभरतीसाठी झालेली कार्यवाही, जिल्हा परिषद स्तरावर करण्यात आलेली कार्यवाही व पदभरती बाबतची सद्यस्थिती याचा अंतर्भाव असेल.
यासोबतच, आगामी परीक्षा घेण्याबाबत चा Action Plan असावा. सदर प्रेसनोट कार्यालयाच्या दर्शनीय भागात लावावी, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती मिळू शकेल. अशा प्रकारची माहिती या परिपत्रकात दिलेली आहे.
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |