Maharashtra HSC Result 2022 : आज दिनांक 8 जून 2022 रोजी 12 वि बोर्डाचा निकाल हा आज विविध संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी twitter द्वारे दिली आहे.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावीचा निकाल हा अखेर जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये बारावीचा एकूण निकाल 94.22% इतके टक्के लागला आहे.
राज्याच्या एकूण विभागांपैकी कोकण विभागाचा निकाल सर्वात 97.21 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे.
दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील मुलींनीच बाजी मारली आहे यामध्ये मुली या 95.32% ऊत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांचा ऊत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 93.29% आहे.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावीची परीक्षा ही संपूर्ण राज्यभरातील एकूण 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी दिली होती.
त्यापैकी विविध stream नुसार परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खालील प्रमाणे आहे.
- विज्ञान – 6 लाख 32 हजार 994
- आर्टस् – 4 लाख 37 हजार 336
- कॉमर्स – 3 लाख 64 हजार 362
- व्यावसायिक अभ्यासक्रम – 50 हजार 202
त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निकाला बाबत चांगलीच उत्सुकता लागली आहे. विद्यार्थ्यांना निकाल हा बोर्डाच्यावेबसाईटवर बघता येणार आहे. सोबतच इतर 4 वेबसाईटवर सुद्धा हा निकाल उपलब्ध होईल जेणेकरून विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण ही निकाल बघताना येणार नाही.
निकाल कसा बघायचा ?
- विद्यार्थ्यांनी प्रथम महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्यावी
- त्यानंतर होम पेजवर "12 वी निकाल 2022" या लिंकवर क्लिक करा
- यानंतर नवीन पेज ओपन होईल, इथे तुम्ही तुमचा परीक्षेचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाकून सबमिट करा
- आईचे नाव टाकून तुमचा 12 वी निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
- तुमच्या निकालाची प्रिंट काढून ठेवा जे की भविष्यात उपयोगी पडेल.
Post a Comment
Post a Comment