राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरतीला तात्पुरती स्थगिती : जाणून घ्या अधिक माहिती
Maharshtra State Excise Department Bharti Update 2023 |
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती :-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिपत्याखालील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान व जवान नि वाहन चालक (गट क) आणि चपराशी (गट ड) संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरीता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ३० मे २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती
या भरती प्रक्रियेतील जवान संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग घोषित करून ही भरती प्रक्रिया व वाढीव पदे व त्या अनुषंगाने संभाव्य रिक्त पदे विचारात घेवून एकत्रितपणे भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.
$ads={1}
त्यामुळे या भरती प्रक्रियेस तात्पुरत्या स्वरूपात शासन निर्देशान्वये स्थगिती देण्यात येत आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त सुनील चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
या भरती प्रक्रियेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत ते अर्ज ग्राह्य धरले जातील. मात्र, अर्जामध्ये तांत्रिक दुरुस्ती करणे गरजेचे असल्यास तशा सूचना कालांतराने कळविण्यात येतील.
तसेच भरती प्रक्रियेची सुधारित जाहिरात सुद्धा काही कालावधी नंतर प्रसिद्ध करण्यात येईल, असेही सहआयुक्त श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागात भरती
बद्दल नवीन प्रसिद्धपत्रक - Click Here
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीमध्ये होणार खालील दुरुस्ती
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात वेगेवगळ्या पदांसाठी भरती निघाली होती. या भरती संदर्भात त्यामध्ये पुढीलप्रमाणे दुरुस्ती केली जाणार आहे.
1. यवतमाळ जिल्ह्यात जवान या पदासाठी भज ड प्रवर्गातील जवान या संवर्गाचे 01 पद रिक्त असल्याचे नमूद केलेले होते. तथापि जवान या संवर्गाचे पद उपलब्ध नसल्याने फक्त यवतमाळ जिल्ह्याकरीता जवान या संवर्गाची पदभरती प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे.
2. भंडारा जिल्ह्यातील जवान नि वाहनचालक या संवर्गातील अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील संवर्गाचे एक पद रिक्त ठेवण्यात येणार आहे. परंतु त्या जिल्ह्यात अनुसूचित जमातीचे या प्रवर्गाचे पद रिक्त नाही. तथापि त्या जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गाचे एक पद रिक्त आहे.
तरी वरील ठिकाणी अर्ज केलेल्या संबंधित उमेदवारांना अन्य जिल्ह्यात अर्ज करण्याबाबत शुध्दीपत्रक जाहीर केले आहे. तसेच वरील ठिकाणी अर्ज केलेले उमेदवार इतर जिल्ह्यात अर्ज करण्यासाठी इच्छुक नसल्यास अशा उमेदवारांना अर्ज शुल्काचा परतावा केला जाईल.
$ads={2}
राज्य उत्पादन शुल्क विभागात
भरतीबाबत शुध्दीपत्रक - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Updates